नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्रमंडळाच्या वतीने भारत राठोड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.

0
नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्रमंडळाच्या वतीने भारत राठोड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.

उदगीर (एल पी उगिले) :
भारत प्रभाकर राठोड हे पनवेल महानगरपालिका येथील अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. या अगोदर त्यांनी उदगीर नगरपालिका येथे मुख्याधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केलेले आहे. त्यांची दूरदृष्टी आणि गोरगरिबाबद्दलची आपुलकी, जिव्हाळा यामुळेच उदगीर येथे अनाथ बेघरांना राहण्याची व जेवणाची सोय व्हावी यासाठी नगरपालिकेच्या वतीने भव्य असे बेघर निवारा केंद्र बांधून मोठी सोय केली आहे.
कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने काम करत उदगीरचे पालकत्व त्यांनी स्वीकारले होते. स्वतःला कोरोना झालेला असताना सुद्धा उदगीर येथील स्वयंसेवी तरुणांना सोबत घेऊन रोटी कपडा बँकेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचा अंत्यविधी स्वतः उपस्थित राहून विधिवत करत होते. शहरात कोरोना पसरू नये यासाठी त्यांनी घेतलेली दक्षता आणि केलेले कष्ट हे आजही उदगीरकर कायम स्मरणात ठेवून आहेत. त्यांचे जीवन हे जणू समाजसेवेला समर्पित जीवन आहे. अनाथांचा नाथ होण्याचे पुण्य त्यांच्या पाठीशी आहे, त्याच मुळे आज उदगीर येथील बेघर निवारा केंद्रामध्ये कित्येक जण आपला वाढदिवस या निराधार लोकांच्या सोबत साजरा करून त्यांना अन्नदान व कपडे दान करतात. एक आदर्श अशी परंपरा त्यांनी सुरू केली. त्या परंपरेची जाण ठेवून तशाच पद्धतीने नवनाथ गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने भरत राठोड यांचा52 वा वाढदिवस साजरा केला.या वेळी नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!