भारतीय बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्षपदी मनोहर कांबळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
उदगीर (एल पी उगिले)
भारतीय बौद्ध महासभा उदगीर तालुक्याची कार्यकारणी पुनर्गठीत करण्यात आली आहे. सदरील निवड सभा लातूरचे माजी अध्यक्ष एस डी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तालुका कार्यकारणीत तालुका अध्यक्ष म्हणून मनोहर किशनराव कांबळे, सरचिटणीस विनायकराव सूर्यवंशी व कोषाध्यक्ष म्हणून मारुतीराव शेंदकर गुरुजी यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण करण्यात आली आहे. या कामी जिल्हा संघटक व उदगीर तालुक्याचे प्रभारी तथा हावगीस्वामी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा डॉ संजय शिंदे तसेच जिल्हा संघटक तथा जळकोट तालुक्याचे प्रभारी उषाताई कांबळे – सोनकांबळे या दोघांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा सरचिटणीस म्हणून माधवराव जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब घाटे आणि संरक्षक उपाध्यक्ष कमलाकर सांगवीकर यांची प्रमुख उपस्थिती या निवड प्रक्रियेमध्ये होती. प्रमुख पदाधिकाऱ्या बरोबरच निवड झालेल्या सर्वांचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे. या निवडीनंतर प्रा. डॉ. संजय शिंदे, माजी न्यायाधीश जाधव यांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे नूतन तालुका अध्यक्ष मनोहरराव कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
मनोहर कांबळे यांनी स्वतःची जमीन बौद्ध विहाराला दान देऊन त्याठिकाणी अतिशय सुंदर अशा पद्धतीचे जेतवन बौद्ध विहार स्वखर्चाने बांधले आहे. निसर्गरम्य परिसरामध्ये या बौद्ध विहारात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही घेतले जातात. मनोहर कांबळे यांची ही निवड अत्यंत सार्थ असून त्यांनी यापूर्वीही जिल्हाभर भारतीय बौद्ध महासभेचे कार्य केलेले आहे. त्यांचा अनुभव संघटन वाढीसाठी निश्चितच कामाला येईल. असे विचार प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी व्यक्त केले आहेत.
