बहिणीं सुनांनी केला सासू-सासऱ्यांचा तुलाभार व वाढदिवस

0
बहिणीं सुनांनी केला सासू-सासऱ्यांचा तुलाभार व वाढदिवस

उदगीर : दोघीं सख्या बहिणीं एकत्र येऊन दोघांच्याही सासू-सासऱ्यांचा वाढदिवस व तुलाभार करून आजच्या नवीन पिढीतील सुनांना प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.
उदगीर येथील उद्योजिका मोहिनी विद्यासागर अचोले व अहिल्यानगर येथील ममता सच्चीदानंद घोणशे-पाटील या दोघ्यां बहिणी मुळच्या सय्यदपूर (ता. देवणी)येथील निवृत्त बँक अधिकारी पांडुरंग कदम यांच्या संस्कारित मुली आहेत.या दोघींनी एकत्र येवून आपल्या देविदास अचोले व सरस्वती अचोले रा. आंबेगाव ता. अहमदपूर ,सुदाम घोणशे व बालिका घोणशे रा. किनी यल्लादेवी ता. उदगीर या आपल्या सासू सासऱ्यांचा अमृतमहोत्सव वाढदिवस व तुलाभार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी उदगीर शहरातील एक मंगल कार्यालय भाड्याने घेवून व सर्व पाहुण्यां -रावळ्यांना व शहरातील मान्यवरांना बोलावून धूम धडाक्यात सासू -सासऱ्यांचा ७५ वा अमृतमहोत्सव वाढदिवस व तुलाभार केला. सर्व पाहुण्यांना व मान्यवरांना मिस्टान्न जेवणही दिले.या कार्यक्रमासाठी माजी मंत्री व आ. संजय बनसोडे उपस्थित राहून आचवले , घोणशे -पाटील व कदम परिवारांना शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक प्रतिभा मुळे-कोठारे यांनी केले. सूत्रसंचालन अहिल्यानगर चे उद्धव काला पहाड यांनी तर आभार प्रदर्शन सच्चीदानंद घोणशे -पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ.विद्यासागर व मोहिनी अचोले,माधवी व शिवाजी अचोले,कावेरी व बालाजी दापके,मालती व बालाजी अचोले, अमृता व बापूसाहेब घोणशे, मुकुंद व संध्या कदम, दीपक नेत्रगावे यांनी पुढाकार घेतला .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!