नांदेड जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी – भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.किशोर देशमुख

0
नांदेड जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी – भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.किशोर देशमुख

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अतुल सावे यांना भेटून दिले निवेदन

प्रतिनिधी:- उध्दव सरोदे –

भाजपाचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख हे काही कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांना वादळीवारा व पावसाने नुकसानीची माहिती झाल्या बरोबर त्यांनी ताबडतोब राज्याचे मुख्यमंत्री व नांदेड जिल्ह्यातचे पालकमंत्री यांना भेटून नांदेड जिल्ह्यातील सर्व ठिकाणी त्यामध्ये सर्वाधिक केळीच्या बागा उद्धस्त झाल्या आहेत याची माहिती देवू नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी केली.याचा प्रत्यय असा आला की अॅड.किशोर देशमुख हे कुठेही असले तरीही घार फिरे आकाशी चित्त तिचे पिल्यापाशी या मनीची प्रचिती आली.नांदेड जिल्ह्यासह अर्धापूर तालुका व शहर तसेच ईतर बऱ्याच ठिकाणी सोमवारी रात्री झालेल्या वादळी वारे व मुसळधार पावसाने केळीच्या बागा उद्धस्त झाल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन भाजपा नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख यांनी मुंबईत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अतुल सावे यांना भेटून दिले व वादळी वारा आणि पावसाने नुकसान झालेल्या अर्धापूर,मुदखेड, हदगाव व संपूर्ण नांदेड जिल्हा तसेच ईतर सर्व ठिकाणातील शेतपिक व केळींच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच वादळी वाऱ्याचा वेग हवामान खात्याकडून घेऊन पीक विमा मंजूर करावा असे निवेदन देण्यात आले.याबाबत सकाळीच पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना फोन द्वारे दिल्या आहेत तसेच ५१ गावात अंदाजे ३७०० हेक्टरच्या आसपास बाधित क्षेत्र असल्याचे जिल्हाधिकारी नांदेड यांनी सांगितले असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!