धन्वंतरीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचा स्थापना दिन साजरा
उदगीर(प्रतिनिधी) :- येथील धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचा स्थापना दिन-10 जून हा प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ.सायराम श्रीगिरे, डॉ.बालाजी कट्टेवार,डॉ.रविकांत पाटील,डॉ.अमोल पटणे, डॉ.प्रशांत बिरादार,डॉ.मयुरी ठाकूर हे व्यासपीठावर होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.दत्तात्रय पाटील यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक च्या अंतर्गत येणाऱ्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व आद्ययावत शिक्षण आणि तसेच गोरगरीब व गरजू किंवा आर्थिक दृष्टीने दुर्बल व निर्धन घटकातील रुग्णांना सवलतीच्या दरात उत्कृष्ट आरोग्य सेवा तथा वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन विषयक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील करार किंवा विद्यार्थी कल्याण विषयक विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ.नामदेव बनसोडे, सूत्रसंचालन डॉ.विष्णुकांत जाधव तर आभारप्रदर्शन डॉ.शिवकुमार मरतूळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.प्राजक्ता जगताप, डॉ.स्नेहल पाटील,डॉ.दीपिका भद्रे,डॉ.प्रवीण बलुतकर,डॉ.अमोल पाटील, डॉ.श्रुती तिवारी यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी डॉ.प्रीती पतंगे,डॉ.शिवानी पाटील, डॉ.केतकी तरडे,डॉ.शिवप्रताप बिरादार, डॉ.स्वप्निल पाटील,डॉ.माधुरी बिरादार, डॉ.जयश्री भरकडे, डॉ.मनीषा कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील डॉक्टर्स,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
