वटपौर्णिमेला समर्थ विद्यालयात वटवृक्ष रोपांची लागवड
उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इको क्लब तर्फे वटपौर्णिमेला वटवृक्ष रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.
एकुर्का रोड येथील पर्यावरण शिक्षण केंद्राचे संचालक तथा समर्थचे सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी यांच्या हस्ते वटवृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण, वर्षा कवडगावे, महानंदा जाधव, आशा कांबळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी वटपौर्णिमेचे महत्व सांगून भविष्यात ही शाळा विद्यार्थी संख्येच्या पटीत झाडे असणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा करण्याचा मनोदय व्यक्त केला.
