एलसीबीची पुन्हा धडाकेबाज कामगिरी,1 लाख 37 हजार रुपये किमतीचा 09 किलो गांजाच्या झाडासह एक जण ताब्यात.

0
एलसीबीची पुन्हा धडाकेबाज कामगिरी,1 लाख 37 हजार रुपये किमतीचा 09 किलो गांजाच्या झाडासह एक जण ताब्यात.
   लातूर (एल पी उगिले)  लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने परवाच बारा किलोच्या जवळपास गांजा आणि त्याचे वाहतूक करणारा वाहन पकडले होते. त्यानंतर पुन्हा अहमदपूर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा धाड टाकून एक लाख 37 हजार रुपये किमतीचा नऊ किलो गांजा सह एक आरोपीला ताब्यात घेतले आहे.     याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर जोरदार कार्यवाही करण्यात येत आहे. त्याअंतर्गत  दिनांक 11/06/2025 रोजी रात्री अहमदपूर पोलीस ठाण्यांतर्गत हगदळ गावाच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखा लातूर व पोलीस ठाणे अहमदपूर च्या पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करत हगदळ गावाच्या शिवारातील एका शेतातून 1 लाख 37 हजार 775  रुपयांचा 9  किलो लागवड करण्यात आलेला गांजा जप्त करण्यात आले आहे. 
   अहमदपूर तालुक्यातील हगदळ गावाच्या  शेत शिवारात गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याअधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, अहमदपूर पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांच्या नेतृत्वातील पथकाने  हगदळ गावाच्या शिवारातील राजू उर्फ देवराव मुंडे (वय 32 वर्ष, राहणार हगदळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर) यांच्या शेतात छापा टाकून गांजाची 9 किलो वजनाची झाडे जप्त केली आहे.
       या प्रकरणी पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात शेतमालक

राजू उर्फ देवराव मुंडे (वय 32 वर्ष, राहणार हगदळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर)याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस ठाणे अहमदपूर चे पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांच्या नेतृत्वात पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव, सहाय्यक फौजदार दिंडगे, पोलीस अंमलदार तुराब पठाण, चौधरी, कछवे, मदने, केंद्रे, सूर्यवंशी, मुंडे, यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!