शांतीनिकेतन पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा सत्कार संपन्न
उदगीर : शांतिनिकेतन वेतनधारी सेवकांची पतसंस्था मर्या अहमदपूरच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार संस्थापक अध्यक्ष श्री डी.बी. लोहारे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला.
नूतन संचालक मंडळात पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रविकिरण साकोळकर, सचिव कपिल बिरादार, उपाध्यक्ष प्रा गणेश मुस्तापुरे तर कोषाध्यक्ष म्हणून विवेकानंद मठपती यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालय लातूरच्या वतीने सहकार अधिकारी अहमदपूर श्रेणी१ श्री टापरे बी बी हे उपस्थित होते.
यावेळी नूतन संचालक श्री लक्ष्मण उदगीरे, श्रीधर लोहारे, नरसिंग हसनाबादे, संदीप पांचाळ, अरुण राठोड, गोविंद बळवंते, दिगंबर धनवे,केशव कोटंबे, शालिनी बोरसुरीकर, नागमणी हाळे, अनिता राजे यांचा सत्कार करण्यात आला या निवडी बद्दल संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डी बी लोहारे गुरुजी, माझी चेअरमन पुष्पाताई लोहारे, संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक सांगवीकर, इंजिनिअर अनिल मुळे, डॉ भालचंद्र पैके, डॉ सुनिताताई चवळे, यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन शिंदे,उपमुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी, सोमनाथ स्वामी, दिगंबर बयास, गौरव भुसारे, बालाजी सोनटक्के यांच्या सह सर्व पतसंस्थेच्या सभासदांनी नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
