रोडवर वयोवृद्धाला लुटणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या चार तासात मुद्दमालसह अटक.

0
रोडवर वयोवृद्धाला लुटणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या चार तासात मुद्दमालसह अटक.
लातूर (एल पी उगिले)   किल्लारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका      80 वर्षीय वृद्ध इसमाला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या चोरणाऱ्या अनोळखी गुन्हेगारांना अवघ्या चार तासात निष्पन्न करून गुन्ह्यातील सोन्याची अंगठी व गुन्ह्यांत वापरलेली मोटारसायकल असे 80,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे किल्लारीची कामगिरी.
       याबाबत थोडक्यात माहिती अशी की,  दिनांक 14/06/2025 रोजी दुपारी 12:30 वाजता पोलीस ठाणे किल्लारी हद्दीतील लामजना शिवारातील रोड वरून जाणाऱ्या एका 84 वर्षीय वृद्धाला "तू आमच्या अंगावर का थुकलास"असे म्हणून मारहाण करून त्याच्या जवळील 15 हजार रुपये रोख रक्कम व हातातील अंगठ्या अज्ञात तीन आरोपींनी मारहाण करून जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे किल्लारी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
         पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे यांनी तात्काळ अधिकारी,अमलदारांचे पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान नमूद  पोलीस तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वयोवृद्धास मारहाण करून रोख रक्कम,सोन्याच्या अंगठ्या  चोरलेल्या तीन आरोपींना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी  सदरचा गुन्हा कबूल करून रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्ध इसमाला मारहाण करून बळजबरीने, त्याच्याकडील रोख रक्कम व सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेऊन पळून गेल्याचे सांगितले.त्यांचेकडून सोन्याची अंगठी व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असे एकूण 80,000/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे वसीम रजाक शेख, (वय 21 वर्ष, राहणार शिंदगाव तालुका रेनापुर जिल्हा लातूर),इम्रान महताब शेख, (वय 24 वर्ष, राहणार शिंदगाव तालुका रेनापुर. जिल्हा लातूर),कौरव जनक लहाडे, (वय 41 वर्ष, राहणार पाखरसांगवी, तालुका जिल्हा लातूर).असे असून नमूद गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास किल्लारी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शिंदे, ढोणे, पोलीस अंमलदार गणेश यादव, दत्ता जाधव, बालाजी लटुरे, सोमवंशी, रवी करके, आबा इंगळे यांनी केली आहे. जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या चार तासात निष्पन्न करून ताब्यात घेतले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!