पत्रकाराचा मुलगा ठरला उदगीरचा अभिमान; सीईटी परीक्षेत 93% गुण
उदगीर (प्रतिनिधी) अत्यंत कष्ट करणाऱ्या आई-वडिलांच्या संघर्षातून परिस्थिती फारशी अनुकूल नसतानाही सम्यक सुरेश बोडके यांनी सीईटी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत 93 टक्के गुण मिळवले आहेत. यशाच्या आकाशात भरारी घेत शामलाल शाळेत प्राथमिक शिक्षण झालेला सम्यक हा आज जिल्ह्यातील एक आदर्श विद्यार्थी ठरलेला आहे.
उदगीर येथील पत्रकार सुरेश सोपानराव बोडके यांचा तो मुलगा असून मोठ्या संघर्षातून त्यांनीह यश मिळवले आहे.
या यशाबद्दल संगेश महामुनी, संजय दळवी पाटील, शिवप्रसाद रंगवाळ, एल पी उगिले, गणेश होळे, कैलास ढोले, श्रीधर सवळे, अमित तीकटे, रऊफ पठाण इत्यादींनी त्याचे अभिनंदन केले आहे.
