प्रबुद्ध भारत संस्थेला मिळालेला शासनाचा पुरस्कार मतदार संघासाठी अभिमानास्पद – आ. संजय बनसोडे
उदगीर (एल पी उगिले)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, मंत्री भरत शेट गोगावले, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, आ. संतोष बांगर यांच्या उपस्थितीत मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात उदगीर तालुक्याचे सुपुत्र प्रा डॉ शिवाजीराव मरेप्पा देवनाळे यांच्या प्रबुद्ध भारत संस्थेस सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन 2023.24 या वर्षीचा महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सन्मानाचा पुरस्कार मिळाला . त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा उदगीर मतदार संघाचे आ. संजय बनसोडे यांच्यातर्फे दिनांक मल्लापूर ता उदगीर येथे संस्थेचे सचिव प्रा डॉ शिवाजीराव मरेप्पा देवनाळे व अध्यक्ष सौ नंदाताई शिवाजीराव देवनाळे यांचा सहपत्नीक शाल, पुष्पगुच्छ आणि भारतीय संविधान भेट देऊन सन्मान पुर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आ. बनसोडे म्हणाले, प्रबुद्ध भारत संस्था व प्रा डॉ शिवाजीराव देवनाळे माझ्या मतदार संघातील आहेत. त्यांना मिळालेला महाराष्ट्र शासनाचा सन्मानाचा पुरस्कार हा मतदार संघासाठी अभिमानाचा आहे. संस्था आणि प्रा डॉ देवनाळे यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य अत्यंत मोलाचे असल्यामुळे त्यांच्या कामाला आमच्या सरकारने न्याय दिला. तुमचे कार्य असेच सामाजिक परिवर्तनासाठी कामी यावे,पुनश्च तुमच्या कार्यास शुभेछा. असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बालाजी भोसले, प्रा डॉ श्याम डावळे, प्रकाश राठोड, मल्लापूरचे पोलिस पाटील मिलिंद वाघमारे, सरपंच विनायक आडे , भगवान आडे,उत्तम वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
