भाकसखेडा गावात कृषिदूतांचे आगमन
उदगीर (एल पी उगिले)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (परभणी) संलग्नित कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील बि. एस्सी (मानद) कृषि पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठीचा अभ्यासक्रम उपक्रम ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक संलग्नता “वर्ष २०२५-२०२६” अंतर्गत उदगीर तालुक्यातील भाकसखेडा या गावामध्ये कृषिदुतांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके यासाठी आगमन झाले. गावामध्ये ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती, माती परीक्षण, पाणी परीक्षण, किड व रोग यांचे एकित्रत व्यवस्थापन, जनावरांचे संगोपन आणि शेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाय आदी विषयांचे सखोल विश्लेषण या कृषिदूतांकडून करण्यात येणार आहे. यांमध्ये औटी शिवराज, आलाट विक्रम, आलाट गोपाल, आलटे प्रसाद, आलम करण, अहिरे अनिकेत, आदित्य बिराजदार, अंधारे सुमित, आदिलेश राठोड, आलुरे सोमेश्वर हे विद्यार्थी भाकसखेडा गावात पदवी अभ्यासक्रमा अंतर्गत घेतलेल्या कृषि विषयक ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी भाकसखेडा गावच्या सरपंच सौ. अर्चना ताई खेडकर, कृषि सहाय्यक श्री. मधुकर मोरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रगतशील शेतकरी सचिन जाधव, श्रीहरी जाधव, एकनाथ जाधव, धनंजय मोरे इ. व गावातील शेतकरी उपस्थित होते. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उप-प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. वानोळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एल. खटके याच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
