तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश आपल्या दारी
उदगीर (एल पी उगिले)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता. उदगीर येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, तंटामुक्तीचे अध्यक्ष देविदास पाटील, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शाळा पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले यांनी तिवटग्याळ गावातील सन 2025 -2026 या शैक्षणिक वर्षांची पटनोंदणी व प्रवेश आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पहिली प्रवेश अर्ज भरण्यासाठी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रवेश आपल्या दारी अंतर्गत 100 % प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज भरून घेण्यात आला. प्रवेश पात्र नवागत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन सन 2025 – 2026 या शैक्षणिक वर्षांची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेष, पाठ्यपुस्तक,बुट सॉक्स, शालेय पोषण आहार अंतर्गत गोड पदार्थ दिला जाणार आहे, असे सर्व विद्यार्थी व पालकांना सांगण्यात आले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, तंटामुक्तीचे अध्यक्ष देविदास पाटील, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शाळा पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले अन्य जण उपस्थित होते.
