घोणसी येथील विवाद ग्रस्त शेतरस्ता शेतकऱ्यांसाठी पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर खुल्ला

0
घोणसी येथील विवाद ग्रस्त शेतरस्ता शेतकऱ्यांसाठी पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर खुल्ला

उदगीर (प्रतिनिधी)
जळकोट तालुक्यातील घोणसी येथे शेतकऱ्यांनी 2021 मध्ये शेत रस्त्याची मागणी केली होती. जळकोटचे तहसीलदार यांच्याकडे शेतकरी सरिता संदीप घोणसिकर, विष्णुकांत मालुसरे, रमेश मालुसरे, प्रकाश लोकरे, माधव मालुसरे, व्यंकट बिरादार, गणेश बिरादार, रमेश बिरादार, बालाजी बिरादार, सूर्यकला मालुसरे, पांडुरंग मालुसरे, बालाजी मालुसरे, गोविंद मालुसरे, नामदेव मालुसरे, तुळशीराम बिराजदार, राम पाटील यांनी अर्ज देऊन रस्त्याची मागणी केली होती. जळकोटचे तहसीलदार यांनी या रस्त्याची रीतसर पाहणी करून या रस्त्याबाबत घोणसी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून हा रस्ता खुल्या करण्याचे आदेश दिले. त्यावरून उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळकोट तहसील चे निवासी नायब तहसीलदार संतोष गुट्टे, घोणसी विभागाचे मंडळ अधिकारी पंडित जाधव, जळकोटचे पोलीस निरीक्षक राजेश चव्हाण, घोणशी येथील ग्राम महसूल अधिकारी महादेव पाटील, उपाधीक्षक भूमी कार्यालयाचे निमतनदार आत उ रहमान सिद्धकी, पोलीस हेडकॉन्स्टेबल हरणे यांनी रीतसर मोजणी करून चुना टाकून खुणा केल्या. त्यानंतर दोन जेसीबी च्या साह्याने रस्ता अतिक्रमणमुक्त केला. यावेळी यावेळी सचितानंद घोणसे, बालाजी पाटील, प्रकाश लोकरे, नामदेव मालसुरे, या माधव मालुसरे, जीवन जानतिने, ज्ञानेश्वर मालुसरे, सोमेश्वर परगे, नारायण मालुसरे, राम मालुसरे, रमेश मालुसरे, राहुल मालुसरे, अमोल मालुसरे यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रस्ता अतिक्रमण मुक्त झाल्याबद्दल शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!