रामकृष्ण पब्लिक स्कूल पहिला दिवस प्रवेशोत्सवाने साजरा
उदगीर (एल पी उगिले) येथील रामकृष्ण इंग्लिश पब्लिकस्कूल बिदर रोड, उदगीर येथे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शाळा सुरू झाली. यावेळी शाळेच्या परिसराची स्वच्छता, शाळेत रांगोळी काढून, फुगे लावून, शाळा सजवली होती. शाळेची घंटा वाजताच शाळेच्या पहिल्या दिवशी लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन, चिमुकल्या विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाळा स्तरावर शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सौ. वैजयंतीमाला हुंडेकर, अरविंद पत्की संस्थापक, शेख शबनम बाबूमिया सहशिक्षक, हिरा रशीद शेख, सौ.मोनिका पटवारी , सौ.वर्षा गट्टेवार , सौ. शिल्पा चव्हाण, सौ. अंजली बोंद्रे , सौ. शर्मिष्ठा पवार, कु. अश्विनी बालूरे , सौ. नागराणी कुलकर्णी, कु. पूजा मोरे, कु. समीक्षा देशमुख, कु. गायत्री उपरबावडे, सौ. सुनीता कंचे, तसेच सरस्वती सूर्यवंशी सेविका, तेलंग प्रियंका सेविका, इत्यादी जण उपस्थित होते. एकंदरीत आनंदी व प्रसन्न असे वातावरणात नवोदित विद्यार्थ्यांचा चैतन्यमय प्रवेश झाला. एकंदरीत आनंदी व प्रसन्न असे वातावरण झाले होते.
