नळगीर येथे कृषीदूतांचे स्वागत, ग्रामीण कृषी जागरूकतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

0
नळगीर येथे कृषीदूतांचे स्वागत, ग्रामीण कृषी जागरूकतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

उदगीर (एल पी उगिले) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्नित कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील कृषी महाविद्यालयाच्या बी.एस्सी. (मानद) कृषी पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता कार्यक्रमांतर्गत नळगीर येथे आगमन केले.
गावातील ग्रामस्थांनी या कृषीदूतांचे उत्साहात स्वागत केले. पुढील १० आठवडे हे विद्यार्थी त्यांच्या पदवी अभ्यासक्रमातून घेतलेल्या कृषी ज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांकडून पुढील विषयावर अभ्यास व मार्गदर्शन होणार आहे: पीक लागवड व तंत्रज्ञान,बीज प्रक्रिया, माती व पाणी परीक्षण,कीड व रोगांचे एकत्रित व्यवस्थापन,जनावरांचे संगोपन,नविन शेती तंत्रज्ञानाचा प्रसार,
शेतीतील समस्या व उपाययोजना.
या उपक्रमात सहभागी झालेले कृषीदुत विद्यार्थी गायकवाड सौरव, जाधव राजन, गायकवाड व्यंकटेश, गडदे शुभम, निलेश देवकते, विशाल धोत्रे, देवकर विक्रम, घार जयप्रकाश, जरीला हेमराज आणि गुंडु रेड्डी.
यावेळी गावचे सरपंच उगीले सिद्धेश्वर, कृषी सहाय्यक भोडेकर सचिन, ग्रामपंचायत सदस्य व प्रगतशील शेतकरी दिलीप मोरे, अनंत मोरे, शेषेराव मोरे, भरत वासरे, बसवेश्वर डिगे, व्यंकटराव वासरे, अनिल तोटे आणि इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. एस. एन. वानोळे, प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.ए.एम. पाटील, आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. नवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!