शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट पुणे यांच्या वतीने अनाथ व निराधार यांना आधार

शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट पुणे यांच्या वतीने अनाथ व निराधार यांना आधार

उस्मानाबाद (सागर वीर) : शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आईवडील नसणाऱ्या अनाथ व निराधार मुलांना शिक्षनासाठी रोख रक्कम व शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात येत असून आज गोवर्धनवाडी ता.उस्मानाबाद येथे बेंबळी, राघूचीवाडी, थोडसरवाडी आदी गावातील मुलांना रोख रक्कम व शैक्षणिक साहित्याचं वितरण मा. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या समवेत, शिवनिश्चल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा.यशवंत गोसावी, रवी निंबाळकर, ह.भ.प. शिवाजी नाना घाडगे, उपसरपंच विनोद थोडसरे आदींच्या हस्ते करण्यात आले. सन 2016 पासून आईवडील नसणाऱ्या अनाथ, निराधार व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची व संगोपनाची जवाबदारी ट्रस्टने उचलली आणि तेव्हा पासून आजतागायत ते काम अविरतपणे सुरू आहे. आज रोजी शिवनिश्चलकडे 100 पेक्षा जास्त अनाथ बालके असून त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च ट्रस्टच्या वतीने केला जातो. प्रतिवर्षी या मुलांसाठी मदतनिधी उपक्रम ट्रस्टच्या वतीने राबवले जात असून शिवनिश्चल परिवाराच्या या कार्यास सर्व सदस्यांचे मन:पुर्वक आभार मानले.

याप्रसंगी माजी उपसरपंच बप्पा भोरे, सुनिल लोमटे, प्रभाकर शेंडगे, पवन वाघमोडे, बालाजी थोडसरे, लखन सुळ, पप्पू मामा लाकाळ, मारुती गाथ(बार्शी), वासुदेव मगदुम, उमेश वाल्हे, किशोर पवार (सोलापूर), देवेंद्र बच्छाव, रोहित पवार, दत्ता वाघमोडे, पांडुरंग आतकरे, सतिष थोडसरे, तानाजी थोडसरे, प्रदिप लोमटे, रमेश लोमटे, पांडुरंग वाघमोडे, अमोल भोरे, नितीन भोसले, महादेव मगर, बालाजी लोमटे, आण्णा थोडसरे, परसु लाकाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!