रंगकर्मीच्या वतीने 28 जून रोजी उदगीर व जळकोट तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
रंगकर्मीच्या वतीने 28 जून रोजी उदगीर व जळकोट तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उदगीर (एल पी उगिले)
रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने उदगीर व जळकोट तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक 28 जून 2024 रोजी दूपारी 1;00 वाजता लिंकन इंटरनॅशनल स्कूल कल्पना चिट्रपट गृह समोरील बाजूस निडेबन येथे करण्यात आले आहे. यावेळी उदगीर व जळकोट तालुक्यातील प्रत्येक शाळेतील व महाविद्यालयातील 10 व 12 वी प्रथम व द्वितीय आलेले विद्यार्थी ,5 वी 8 स्कॉलरशिप 200 गुण प्राप्त विद्यार्थी तसेच 8 वी 9 वी एन एम एम एस व शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी ,एमपीएससी पीएसआय, युपीएससी व पीएचडी प्राप्त गुणवंताचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आहे .यावेळी स्पर्धापरीक्षा व दहावी बारावी नंतरच्या करिअर संदर्भात मार्गदर्शन ही मान्यवरांकडून केले जाणार आहे. शाळा ,महाविद्यालयाने आपल्या शाळेतील व महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे प्रा बिभीषण मद्देवाड 98 23 160 552 यांच्याकडे द्यावेत. पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड ,सचिव प्रा ज्योती मद्देवाड मुख्याध्यापक दादाराव दाडगे , ॲड. महेश मळगे ,रसुल दा पठान, रामदास केदार,लक्ष्मण बेंबडे ,मारोती भोसले , महादेव खळूरे , सिद्घार्थ सुर्यवंशी , सचीन शिवशेट्टे ,जहाँगीर पटेल,निता मोरे, ज्ञानेश्वर बडगे ,विवेक होळसंबरे, बालाजी भोसले , अर्चना पाटील , हणमंत केंद्रे ,नागनाथ गुट्टे , मनोहर लोहारे ,संदिप निडवदे आदीनी केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!