शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हेर गावात कृषिदूतांचे आगमन
उदगीर (एल पी उगिले)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी (परभणी) संलग्नित कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील बि. ए.स्सी (मानद) कृषि पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठीचा अभ्यासक्रम उपक्रम ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक संलग्नता “वर्ष २०२५-२०२६ अंतर्गत उदगीर तालुक्यातील हेर या गावामध्ये कृषी दुतांचे प्रशिक्षणासाठी आगमन झाले. गावामध्ये ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती, माती पाणी परीक्षण, किड व रोग यांचे एकित्रत व्यवस्थापन, जनावरांचे संगोपन आणि शेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाय आदी विषयांचे सखोल विश्लेषण या कृषीदूतांकडून करण्यात येणार आहे. यांमध्ये आशिष यादव, बळीराम तिडके, संकेत उकिरडे, प्रथमेश तुपसौंद्र्य, जगदीश ठाकरे, वेंकटेश कोडके, प्रवीण इंगळे, प्रथमेश धमशेट्टी, बांगर सुजित हे विद्यार्थी हेर गावात पुढील दहा आठवडे पदवी अभ्यासक्रमात घेतलेल्या कृषीविषयक ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.यावेळी हेर गावचे सरपंच संदीप सूर्यवंशी, कृषी साहाय्यक श्रीमती अमरपल्ली , ग्रामपंचायत सदस्य विलास कांबळे, तसेच गावातील प्रगतशील शेतकरी बळवंत घोगरे, अनंत ढगे, महेश कडोळे, संगमेश्वर मिटकरी, संगमेश्वर अशोक मिटकरी, इ. व गावातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन वानोळे, महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ. ए. पी. सूर्यवंशी, उप प्राचार्य डॉ.ए.एम पाटील,कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. एम. हमाने याच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
