विकास पुरुष युवा नेते सुनील केंद्रे यांचा नागरी सत्कार संपन्न

0
विकास पुरुष युवा नेते सुनील केंद्रे यांचा नागरी सत्कार संपन्न

उदगीर (एल पी उगिले) उदगीर तालुक्यातील कुमठा (खुर्द) ग्रामपंचायतच्या वतीने गावातील नागरिकांच्या सोयी सुविधांचे अनेक प्रकल्प राबवून, नागरी सुविधा पुरवल्याबद्दल तसेच विशेष करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन त्यांचे प्रश्न सोडवल्याबद्दल, कुमठा ग्रामस्थांच्या वतीने खास करून शेतकऱ्यांच्या वतीने पुढाकार घेऊन सुनील केंद्रे यांचा नागरी सत्कार गावातील मंदिराच्या समोर करण्यात आला. ग्रामस्थांनी सुनील केंद्रे यांच्या विकास कामाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ज्या तरुणाला राजकारणाचा गंध नाही, तो काय काम करू शकतो? असे म्हणून हिणवले जात होते. त्याच तरुणाने आज गावचा कायापालट करत गावची सुरक्षा, नागरी सुविधा, नागरिकांची सुरक्षा या सर्व गोष्टींचा विचार करून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे असेल, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विकासाच्या दृष्टीने विशेष लक्ष देणे असेल, नाहीतर शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शेत रस्त्याचे प्रश्न असतील, ते प्रश्न सोडऊन अनेक रस्ते अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांना सुविधा करून दिले आहेत. हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित होता. मात्र या प्रश्नाकडे कोणीही फारशा गांभीर्याने पाहत नव्हते, युवा नेते सुनील केंद्रे यांनी गावच्या विकासासाठी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत मध्ये आपले स्वतंत्र पॅनल थांबवले. सुरुवातीला हा काय करू शकेल? असे बोलले जात होते. मात्र या तरुणाने ते सर्व करून दाखवले आहे. अजूनही अनेक विकासाचे प्रकल्प प्रलंबित आहेत, मात्र विकासाची त्यांनी घेतलेली गती विचारात घेऊन ग्रामस्थांनी प्रेमाची उधळण करत गावच्या मंदिरासमोर जाहीरपणे सुनील केंद्रे यांचा सत्कार करून जणू ऋण व्यक्त केले आहे.
सत्काराला उत्तर देताना सुनील केंद्रे यांनी अत्यंत भावनिक होत, सर्व गावकऱ्यांनी आपल्याला पुत्रवत प्रेम दिलेले आहे. त्या प्रेमाची उत्तराई होणे शक्य नाही, मी त्या ऋणामध्येच राहू इच्छितो. गावकऱ्यांनी दाखवलेले हे प्रेम, हा जिव्हाळा कायम जपण्यासाठी गावातील प्रत्येकाची निकड विचारात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच आपण प्रयत्नशील राहू. असे अभिवचनही त्यांनी दिले.

चौकट……

धनंजय मुंडे आणि संजय भाऊ बनसोडे हेच विकासाचे शिल्पकार….

आपल्या गावचाच नाहीतर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून माजी मंत्री धनंजय भाऊ मुंडे आणि संजय भाऊ बनसोडे यांनी या भागाच्या विकासासाठी सदैव विकास निधी दिलेला आहे. मी तर धनंजय भाऊ मुंडे यांचे बोट धरून राजकारणात आलो. त्यांनीही आपल्यावर खूप प्रेम केले. त्यांच्या आशीर्वादानेच राजकारणाचे धडे गिरवता आले, आज उदगीर विधानसभा मतदारसंघाचा झालेला चौफेर विकास हा माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे यांच्यामुळेच झालेला आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आपल्या राजकारणामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा हातभार असला तरी प्राधान्याने धनंजय मुंडे आणि संजय भाऊ बनसोडे यांनी विशेष लक्ष देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. मागणी केल्याप्रमाणे विकास निधी दिला. त्यामुळे मी गावचा विकास करू शकलो. इतकेच नाही तर माझ्या पॅनलला विजयी करण्यासाठी सुद्धा धनंजय भाऊ मुंडे आणि संजय भाऊ बनसोडे यांनी दिलेले आशीर्वादच कारणीभूत ठरले आहेत. त्यांची प्रेरणा सतत माझ्या पाठीशी राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवत असताना गावच्या विकासाला प्राधान्य देणे, हे मी ध्येय ठेवले आहे. माझ्या डोळ्यासमोर सतत धनंजय भाऊ मुंडे आणि संजय भाऊ बनसोडे यांचाच विकासाचा आदर्श राहणार आहे. असेही सुनील केंद्रे यांनी स्पष्ट केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!