संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यकारणीने केले राजमाता मां जिजाऊनां अभिवादन.
उदगीर (प्रतिनिधी) येथे संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कार्यकारणीने राजमाता जिजाऊंना अभिवादन केले . संभाजी ब्रिगेडचे लातूर जिल्हा अध्यक्ष राजकुमार माने व संभाजी ब्रिगेडचे बिदर चे जिल्हा अध्यक्ष सतीश दादा वासरे हे दोन्ही जिल्हाध्यक्ष कार्यक्रमास उपस्थित होते. दोन्ही जिल्हाध्यक्षाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले.
राजकुमार माने यांनी जिजाऊ वंदना घेतली . राजमाता मां जिजाऊ ने बुलढाणा जिल्ह्यातील राजा सिंदखेड येथे लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 ला जन्म घेतलेल्या राजमाता जिजाऊ धैर्यनिष्ठ व करारी स्वभावामुळे मराठा साम्राज्याचा पाया भक्कम केला. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी राजांच्या लहानपणापासून धर्म व समता आणि न्यायाचे संस्कार दिले. रामायण, महाभारत यासारख्या कथेतून शिवबांना शौर्य आणि कर्तव्याची प्रेरणा दिली. त्यांनी सामाजिक व धार्मिक योगदान दिले. आजच्या मातानी व शिवकन्यांनी मा जिजाऊ चे विचार व कर्तव्य अचरणात आणण्याची गरज आहे .असे संभाजी ब्रिगेडच्या कार्यातून दिसून येते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार माने, संभाजी ब्रिगेडचे बिदर जिल्हा अध्यक्ष सतीश दादा वासरे ,संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष उत्तमरावजी फड, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब चिंचोलकर ,जिल्हा सहसचिव व्यंकट थोरे, जिल्हा संघटक राम रावणगावे, श्रीधर कोयले शेलाळकर ,दत्ता गिरी महाराज, शिवश्री करण इत्यादि उपस्थित होते.
