पोस्ते ज्युनिअर कॉलेजचा नीट परीक्षेत घवघवीत यश
उदगीर (एल पी उगिले)
उदगीर येथील नामवंत पोस्ते-पोद्दार लर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवून शहराचे नाव उज्वल केले आहे.
या यशात रामकृष्ण बिरादार या गुणवंत विद्यार्थ्याने विशेष कामगिरी करत 488 गुण प्राप्त करून उदगीर शहराचा आणि कॉलेजचा गौरव वाढवला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या वतीने भव्य स्वागत आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे सचिव सुरज काशिनाथ पोस्ते, मुख्याध्यापक दिगंबर शेकापूरे, उपमुख्याध्यापक डॉ. मुबारक मुल्ला, विज्ञान विभागाचे सर्व शिक्षक व समन्वयक शिक्षकवृंद उपस्थित होते.
रामकृष्ण बिरादार यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपल्या पुढील वैद्यकीय शिक्षणाचे ध्येय स्पष्ट केले.
शाळेचे सचिव सुरज पोस्ते यांनी त्यांचे कौतुक करत भावी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
उदगीरमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अग्रगण्य शाळांमध्ये पोस्ते-पोद्दार लर्न स्कूलचा अग्रक्रम असल्याचे पुन्हा एकदा या यशातून सिद्ध झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
