राहुल गांधींना घाबरून सरकारने नियम ९३ बदलला- विवेक जाधव
उदगीर (प्रतिनिधी)
लोकसभेचे विरोधी पक्षनेते जननायक राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने ४० लाख बोगस मतांची वाढ केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देशासमोर ठेवली होती. या “वोट फिक्सिंग” मध्ये काही ना काही तथ्य असल्याकारणाने च केंद्र सरकारने नियम ९३ मधे बदल केला आहे. जननायक राहुलजी गांधी लोकशाही वाचविण्यासाठी भक्कम लढा देत आहेत. या देशात सामाजिक एकता, बंधुता व प्रेमभाव टिकवून ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु मनुवादी भाजप सरकारला राहुल गांधींच्या या धोरणांची भीती वाटत आहे.
एकेकाळी काँग्रेसमुक्त भारत करू म्हणणारी भाजपच आज काँग्रेसयुक्त झालीय, करोडो रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप ज्यांच्यावर केला त्याच नेत्यांना “भाजप वॉशिंग पाऊडर” ने धुवून आपल्या पक्षात भरती करत आज भाजपच काँग्रेसयुक्त झालीय.
कुठेतरी वैचारिक लढाईत त्यांची होत असलेली हार व सर्वसामान्य जनतेसाठी राहुल गांधींचा उठत असलेला आवाज या गोष्टींना भाजप घाबरत आहे हे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे.
काँग्रेस पक्ष या देशासाठी जीवाचं रान करीत आला आहे व देशातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आजही काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता जोमाने सरकारविरोधात लढत आहे असे मत उदगीर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विवेक पंडितराव जाधव यांनी मांडले आहे.
