छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
उदगीर (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात 21 जुन 2025 शुकवार रोजी आयुश मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत शासकिय आदेशान्वये आर्ट ऑफ लिव्हिंग व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस “योग संगम” साजरा करण्यात आला. या वर्षी योगाचे “ब्रीद वाक्य होते “एक धरती एक योगा ” .या प्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.आर. एम. मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग चे तज्ज्ञ प्रशिक्षक श्री. राजकुमार प्रतापराव मोरे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात योग प्रार्थनेने करण्यात आली. शारीरिक हालचाली, ताडासन, वज्रासन, त्रिकोनासन, कटीचकासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन, वकासन, उस्ट्रासन, प्राणायम, अनुलोम विलोम. इत्यादी योगा प्रकाराचे प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन केले.
कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.आर. पी.गिरी यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता. कार्यकम यशस्वीतेसाठी प्रा. नेहाल खान, प्रा.गजानन माने, श्री. देविदास उदगीरे, श्री. सज्जन बन, श्री क्षिरसागर यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा. नेहाल अहमद खान यांनी केले.
