सैनिकी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0
सैनिकी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

उदगीर (प्रतिनिधी)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग उदगीर येथील योगगुरु शालिवान अणारगट्टे, पाटील , 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर येथील हवालदार शिवशंकर निकम, हवालदार रविकुमार, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, विभाग प्रमुख संतोष चामले, विलास शिंदे , प्रा. शिवाण्णा गंदगे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शालिवान अणारगट्टे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला. दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. योगा एका दिवसासाठी नसून दररोज करावयाची गोष्ट आहे. योगामुळे आपले शरीर व मन तंदुरुस्त राहते . शरीर व आत्मा यांना जोडण्याचे साधन म्हणजे योग होय.
एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले, २०२५ या वर्षाची थीम एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लिए योग, ही आहे.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्याबद्दल जागरुकता समाजामध्ये पसरवणे हा योग दिनाचा उद्देश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार श्रीकांत देवणीकर यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रल्हाद येवरीकर, प्रा. युवराज दहिफळे, शिक्षण निदेशक सुधीर गायकवाड, शिवकुमार कोळ्ळे, उमाकांत नादरगे, मारोती मारकवाड, नागेश पंगू, बालाजी कांबळे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!