महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात योग दिनानिमित्त योगशिबिराचे आयोजन
उदगीर (प्रतिनिधी)महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगशिबिराचे आयोजन करण्यात आले. योग शिक्षक शंकरराव चापोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शिबिरामध्ये विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचे प्रात्यक्षिक देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, प्रा. डॉ. एस. व्ही. भद्रशेट्टे, प्रा. डॉ. एन. डी. वगशेट्टी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कमांडर प्रा. आर. पी. साबदे, क्रीडासंचालक प्रा. एस. बी. मुंढे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. ए. पी. मोरे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम विषद करत विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी च्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
