लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत जागतिक योग दिन साजरा

0
लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत जागतिक योग दिन साजरा

उदगीर (प्रतिनिधी): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात बलोपासक मंडळातर्फे जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख पाहुणे म्हणून शंकरराव लासुणे संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा कार्यवाह स्थानिक समन्वय समिती, उदगीर,प्रा.डॉ.रवी पाटील धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालय,उदगीर योग प्रशिक्षक म्हणून प्रतिभा संजय मोघेकर,आर्ट ऑफ लिव्हिंग टिचर,बेंगलोर व सपना बियाणी तसेच, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.रवी पाटील यांनी आपल्या जीवनात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यांनी ऋषी पतंजली यांचा अष्टांगयोग,स्वामी रामदेवबाबा यांचे योग व प्राणायामचे महत्त्व विद्यार्थ्यांना करुन दिले.दररोज योग व प्राणायाम केल्याने आपले मन प्रसन्न व शरीर बलवान होते.यासाठी आजपासून सर्वांनी योग व प्राणायाम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
योग प्रशिक्षक प्रतिभा व सपना यांनी विविध योगासने,ध्यानधारणा व प्राणायाम यांचे विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली.प्रास्ताविक व सुत्रसंचलन तसेच ,आभार श्याम गौंडगावे यांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!