डॉ. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांचा ल. सा. क. म. कडून सत्कार
उदगीर (प्रतिनिधी
उदगीर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व श्री. धोंडूतात्या कनिष्ठ महाविद्यालय, माळहिप्परगा येथील मराठी विषयाचे प्राध्यापक,कवी आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती, पुणे चे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर निवृत्तीराव हंडरगुळीकर यांना अमेरिकेतील” वॉशिंग्टन डिजिटल युनिवर्सिटि”कडून त्यांच्या परिवर्तनवादी मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी “डॉक्टर ऑफ लिटरेचर इन मराठी “ही सर्वोच्च मानद डॉक्टरेट मिळाली आहे. त्याबद्दल लेखक हंडरगुळीकर यांचा त्यांच्या शिवशक्तीनगर येथील निवासस्थानी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ, उदगीर यांच्या वतीने प्रा. डॉ. मारोतीराव कसाब, डॉ. व्यंकटराव सूर्यवंशी, शाहीर अंकुश सिंदगीकर यांच्या शुभहस्ते हंडरगुळीकरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हंडरगुळीकर यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. हंडरगुळीकर यांनी सर्वांचेच आभार मानले.
