कार्यकर्त्यांचे प्रेम सकारात्मक कार्याची ऊर्जा देते – ना. बाबासाहेब पाटील

0
कार्यकर्त्यांचे प्रेम सकारात्मक कार्याची ऊर्जा देते - ना. बाबासाहेब पाटील

उदगीर (एल पी उगिले) केवळ अहमदपूर विधानसभा मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते आपल्यावर अतोनात प्रेम करतात, आणि कार्यकर्त्यांचे हे प्रेम हीच शिदोरी घेऊन मी काम करतो. कार्यकर्त्यांचे हे प्रेम सकारात्मक कार्यासाठी ऊर्जा देते. असे विचार राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुका दाल असोसिएशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी सुदर्शन मुंडे यांच्या समवेत व्यंकट घुगे, शंकर जाधव, चंदू बिरादार हेही उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. बाबासाहेब पाटील म्हणाले की, कोणत्याही राजकीय नेत्याला त्याच्या कार्यकर्त्याकडून मिळालेले प्रेम हीच त्याची शक्ती असते. परमेश्वराच्या कृपेने आपल्या परिवारावर संपूर्ण जिल्हाभरातून कार्यकर्ते जीवापाड प्रेम करतात. ही पुण्याई घेऊन मी काम करत आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह, प्रेम हीच माझी शक्ती आहे. असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुदर्शन मुंडे यांनी ना. बाबासाहेब पाटील यांच्या विकासात्मक दृष्टी आणि त्यांनी आजपर्यंत केलेल्या विविध कामासोबतच त्यांच्याकडे असलेला सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव लातूर जिल्ह्यासाठी उपयोगाला येत आहे. असे सांगतानाच त्यांनी आजपर्यत केलेल्या विकास कामाचा आणि सहकार क्षेत्रातील कामाचा आढावा थोडक्यात त्यांनी मांडला.आता ते सहकार मंत्री झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदाच मिळणार आहे. आपण नशीबवान आहोत की, आपल्यावर प्रेम करणारा नेता मंत्री आहे. सकारात्मक दृष्टी आणि विकास कामे करण्याची प्रवृत्ती असलेला हा नेता लातूर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे असेही सांगितले. आभार प्रदर्शन संयोजक सुदर्शन मुंडे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!