लिटल एंजिल्स दत्तगुरू इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन व पालक मेळावा संपन्न
उदगीर (एल पी उगिले)
आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक राजकुमार मोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच पालक मेळावा आयोजित करण्यात आला
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या मंगल वंदनेने झाली. त्यानंतर राजकुमार मोरे यांनी योगाचे शास्त्रीय महत्त्व, आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे प्रात्यक्षिक देखील विद्यार्थ्यांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व पालकांनीही मोठ्या उत्साहात या सत्रात सहभाग घेतला.
यावेळी संस्थेच्या सचिव आशा ममदापूरे, मुख्याध्यापक सचिन पाटील, उपमुख्याध्यापक माधव भांगे आदी उपस्थित होते. शाळेतील शिक्षक रवि चन्नाळे, मोमिन सद्दाम, प्रशांत भांगे, सरफराज मनियार, शुभम उदगीरकर, आनिता सुवर्णकार, राजेश्वरी गादगी, कविता तोंडारे, सारिका पेचफुले, प्रिती शेटकार, शकुंतला डांगे, संगीता पोपलाई, कविता क्षीरसागर, दिक्षालिनी शिंदे आदींनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी ‘योग हे जीवनशैलीचे अंग असावे’ या विचाराचा स्वीकार करण्याचे ठरवले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
