विरोधकांच्या भूलथापांना व अमिषाला बळी पडू नका,भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांचे आवाहन
लातूर (प्रतिनिधि)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निवडणुकीत दिलेल्या कोणत्या कोणत्या आश्वासनांची पूर्तता केली, याबाबतची माहिती देणारा भाजपा हा पहिलाच पक्ष असेल, असे सांगून लातूर भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी गरीब कल्याण व विकास योजना राबवताना कोणताही भेदभाव केला नाही. याउलट विरोधकांनी सत्तेत असताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सर्वसामान्यांना वार्यावर सोडण्याचे काम केले होते. आता हेच विरोधक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची दिशाभूल करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर विरोधक अनेक आश्वासनांचा पाऊस पाडून भूलथापा देतील आणि विविध आमिष दाखवतील मात्र या भुलथापांना व अमिषाला बळी पडू नका, असे आवाहन अजित पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास 11 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राबवण्यात येत असलेल्या संकल्प से सिद्धीतक या अभियानाच्या माध्यमातून लातूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या विवीध चौक सभांमध्ये अजित पाटील कव्हेकर बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, सरचिटणीस अॅड. दिग्वीजय काथवटे, रवी सुडे, अॅड.प्रदिप मोरे, मीना भोसले प्रदेश कार्यकारिणी सदस्य मधुसूदन पारीख, मंडल अध्यक्ष सुरेश जाधव, राहुल भुतडा, सचिन सुरवसे, काकासाहेब चौगुले, गोपाळ वांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गरीब कल्याणासाठी विवीध योजना राबवल्या असल्याचे सांगून या योजना राबवताना त्याचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी पारदर्शक कारभार केला असल्याचे अजित पाटील कव्हेकर यांनी सांगितले. ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले आहे, त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र व राज्य सरकारमध्ये प्रत्येक प्रतिनिधीस सतर्क राहण्याचे निर्देश देण्याचे काम केले. त्यामुळेच या योजनांचा लाभ मिळून प्रत्येक नागरिकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडला असल्याचे स्पष्ट केले. लातूर शहरातील केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ लाखो नागरिकांना मिळालेला असून या माध्यमातून घरकुले, शौचालय, उज्वला गॅस, आयुष्यमान भारत योजनेच्याद्वारे मोफत उपचार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून 1 लाख 16 हजार लाडक्या बहिणींना दर महिना 1500 रुपयेचा लाभ मिळत असल्याचे कव्हेकर यांनी सांगितले.
ज्यांना सर्वसामान्यांच्या हिताचा विचार आहे, त्यांच्या सोबतच जनतेने राहावे असे सांगून विरोधकांनी मात्र त्यांच्या सत्तेच्या काळात किती नागरिकांना कोणत्या योजनेचा लाभ मिळाला असा प्रश्न अजित पाटील कव्हेकर यांनी उपस्थित केला. विरोधकांनी निवडणुकीत दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केली असल्याची सांगत आता विरोधकांकडून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम होत असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर विरोधक पुन्हा विविध आश्वासनांचा पाऊस पडून भूलथापा देतील आणि विविध आमिषे दाखवतील. मात्र या त्यांच्या तंत्राला नागरिकांनी हाणून पडून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणार्या पक्षासोबत राहावे असे आवाहन अजित पाटील कव्हेकर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जागतिक स्तरावर भारताची नवी ओळख निर्माण करून देशाला सक्षम, सुरक्षित व स्वावलंबी असल्याचे सांगून प्रदेश प्रवक्ता प्रेरणा होनराव यांनी देशातील प्रत्येक नागरिकांना मोदी सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनांचा लाभ मिळाला असल्याचे सांगितले. गरिबांचे कल्याण करत अनेक विकास योजना राबवताना पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्य माणसांनाच केंद्रबिंदू ठेवले आहे. त्यामुळेच अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळाला असून आगामी काळातील हे काम त्यांच्याकडून होणारच आहे त्याचबरोबर 2047 पर्यंत देशाला विकसित करण्याचा त्यांनी जो संकल्प केला आहे तो सिद्धीला नेण्यासाठी प्रत्येकांनी साथ द्यावी असे आवाहन प्रेरणा होनराव यांनी केले आहे.
या चौक सभांमध्ये माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, सरचिटणीस अॅड.दिग्विजय काथवटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या चौक सभांना अतिश कांबळे, चंद्रकांत खटके, महेश झंवर, अॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, विनय जाकते, निखील गायकवाड, रविशंकर लवटे, शैलेश भडीकर, संजय गीर, सुवर्णा येलाले, बालाजी गाडेकर, माधव यनकफळे, भागवत तीगिले, योगेश गंगणे, गजेंद्र बोकन, पवन स्वामी, सिधाजी पवार, गणेश खाडप, सचिन जाधव, गणेश कसबे, सीमा करपे आदींसह पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग क्र. 5 मधील महिलांचा भाजपात प्रवेश.
महात्मा बसवेश्वर मंडल अंतर्गत झालेल्या चौक सभेमध्ये प्रभाग क्र.5 मधील तुळजा बनसोडे, सारिका कदम, मीरा बनसोडे, सारिका बनसोडे, महानंदा मोरे, सरोजा रेड्डी, ऐश्वर्या बनसोडे, मनीषा बनसोडे, शिल्पा मानकरी, शांता अडसुळे, हसीना तांबोळी, विजयमाला बनसोडे, कमलाबाई वाघे, मुमताज शेख, भारतबाई बनसोडे, उषा मगर, उषाबाई काकडे, शांताबाई मेहता, रधाबाई कांबळे,समरीन शेख, रेशमा वाघमारे, मन्ना आतार आदींचा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत व मंडल अध्यक्ष राहुल भुतडा, सौ.सुवर्णा येलाले यांच्या पुढाकारातून भाजपात प्रवेश केला.
