उदगीर युवक काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
उदगीर (प्रतिनिधी) येथे लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.शिवाजी काळगे साहेब यांच्या हस्ते व उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मंजूरखान पठाण, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शीलाताई पाटील, काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीकांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोटचे संचालक आशिष पाटील राजूरकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्रीनिवास एकूरकेकर, युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विवेक जाधव, तालुका सरचिटणीस सद्दाम बागवान, प्रितम गोखले, कनिष्क शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष प्रवीण बिराजदार यांच्या संमतीने युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष आदर्श उर्फ सोनू गौतम पिंपरे यांनी उदगीर शहर युवक काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. यावेळी प्रविन पटवारी यांची शहर उपाध्यक्ष, प्रशांत हुडगे यांची शहर सचिव, पवन सुर्यवंशी यांची सोशलमिडिया शहर प्रसिद्धी प्रमुख व मंगेश येरकुंडे यांची ओबीसी विभाग शहराध्यक्ष पदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील व शहराध्यक्ष मंजूरखान पठाण व उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्याशी उदगीर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी, उदगीरच्या रुग्णालयासंदर्भातील अडचणी, तालुक्यातील वाढता भ्रष्टाचार व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विवेक जाधव यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळात पक्षसंघटनेसाठी उत्तम कार्य करण्यासाठी सदिच्छा दिल्या. लवकरच उदगीर तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात येणार असून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, येणाऱ्या काळात तालुक्याच्या विकासासाठी एक सकारात्मक बदल घडवायचा असून या बदलासाठी तालुक्यातील तरुणांनी युवक काँग्रेसशी जोडले जाण्याचे आवाहन केले.
श्रीकांत पाटील यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सद्दाम बागवान यांनी केले व आभार प्रीतम गोखले यांनी मानले.
