उदगीर न्यायालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
उदगीर (प्रतिनिधी) येथील न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उदगीर न्यायालयातील सर्वच न्यायाधीश उपस्थित होते. वाय. बी. गमे, जिल्हा न्यायाधीश उदगीर, एस. वाय. रचभारे दिवाणी न्यायाधीश व.स्तर उदगीर, व्ही. बी. कांबळे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर उदगीर, एस. ए. जमादार दुसरे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर उदगीर, व्ही आर. घराळ पहिले सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर उदगीर, के. ए. यादव दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर उदगीर, बी. आर. झेंडे तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर उदगीर, ए. मुंढे अध्यक्ष विधीज्ञ संघ, कर्मचारी एम. एल. सूत्रळे अधीक्षक जिल्हा न्यायालय एक. ज्येष्ठ विधीज्ञ एस. टी. पाटील, सचिव ॲड. चंद्रशेखर भोसले आदी उपस्थित होते. पतंजली योग समिती उदगीरचे सचिव प्रा.श्रीराम चामले यांनी हा योग वर्ग घेतला. जेष्ठ विधीज्ञ महेशजी मळगे यांनी योगदिना बद्दल प्रास्ताविक केले.
त्यानंतर न्यायाधीश वाय. बी. गमे यांनी योगशिक्षक प्रा. श्रीराम चामले यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गायत्री मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉल प्रमाणे साधारण एक तासाचा योग वर्ग (प्रात्यक्षिक) घेण्यात आला. याप्रसंगी योगशिक्षक प्रा.श्रीराम चामले यांनी दैनंदिन जीवनामध्ये योग साधनेचे महत्त्व प्रतिपादन करत असताना योगसाधना केल्यामुळे व्यक्तीचे मानसिक, भावनिक व बौद्धिक आरोग्याचा विकास होतो, त्याचबरोबर आपल्यात अंतर्भूत असलेली चैतन्य शक्ती जागृत होते, तसेच सातत्याने योग साधना केली तर आपल्या मेंदूतून चार प्रकारचे हार्मोन्स डोपामाईन, अक्साटोनिन, सेरेटोनिन व इंडोरफिन हे हार्मोन्स बाहेर पडतात. त्यामुळे व्यक्तीची वृत्ती आनंदी, उत्साही होते, तसेच त्या व्यक्तीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. सर्व कार्यात व्यक्तीला उत्साह वाटतो. चैतन्यशक्ती आपल्यामध्ये जागृत होते. आपले मन विशाल व व्यापक बनण्यास मदत होते. आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक कृती वाढीस लागते. मात्र ही योगसाधना सातत्याने आणि नियमितपणे केल्यास त्याचा लाभ होतो. यावर योग शिक्षक प्रा. श्रीराम चामले यांनी भर दिला. सर्व न्यायाधीश व उपस्थित सर्वच योग साधकांना योग साधना: काळाची गरज हे पुस्तक योगशिक्षक प्रा श्रीराम चामले यांनी भेट दिले. आभार वाय. बी. गमे यांनी मानले.
