डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले योग प्रात्यक्षिकाचे सादरीकरण
उदगीर (एल पी उगिले)
येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालय, उदगीर व जिव्हाळा ग्रुप, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था सचिव देविदासराव नादरगे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दशरथराव शिंदे, विश्वनाथराव बिरादार माळेवाडीकर उपस्थित होते. योग प्रशिक्षक म्हणून उदगीर येथील सुप्रसिद्ध फिजीओथेरपिस्ट डॉ. जैद असगर शेख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय योग दिना बद्दल बोलताना संस्था सचिव देविदासराव नादरगे यांनी योगासन करण्याचे फायदे व महत्त्व सांगितले. तसेच योगा करणे का गरजेचे आहे. याबद्दलची माहिती दिली. योग प्रशिक्षक डॉ.जैद असगर शेख यांनी योगासनाच्या विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून दाखवले व त्याबद्दलची माहिती सांगितली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले .या योग शिबिरास डॉ. असगर अली शेख, रमाकांतराव बनशेळकीकर गुरुजी, वैजनाथराव पंचगल्ले, पांडुरंगराव बोडके, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. करखेलीकर , डॉ. वर्धमान , रामराव मोमले, श्रीमती चौधरी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी पालक व ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती.
