विद्यावर्धिनी विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केला नियमित योगा करण्याचा संकल्प

0
विद्यावर्धिनी विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केला नियमित योगा करण्याचा संकल्प

विद्यावर्धिनी विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केला नियमित योगा करण्याचा संकल्प

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील विद्यावर्धिनी विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आर्ट ऑफ लिविंगचे आद्य प्रवर्तक श्री.श्री. रविशंकरजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सदरील शिबिराची सुरुवात करण्यात आली.
  भारताने बऱ्याच परंपरा, रूढी, आधुनिकता जगाला दिल्या असून योग हा देखील त्याचाच एक अविभाज्य भाग असून आज प्रत्येक स्तरावर योग साधना होताना दिसत आहे; अहमदपूरच्या प्रसिद्ध अशा विद्यावर्धिनी शाळेत आज रोजी सदरील योग शिबिर खेळी-मेळीच्या आणि योग शिक्षक श्री अनिल चवळे सर योग शिक्षिका सौ.वृषालीताई चवळे मॅडम तसेच सदरील शाळेचे अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील सर आणि मुख्याध्यापिका सौ.सुषमा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाने पार पडले.
  यावेळी शाळेतील नियमित प्रार्थना आणि नंतर योगासने घेऊन सदरील शिबिरास सुरुवात झाली. यावेळी शाळेतील अर्चना माने मॅडम यांनी काही विद्यार्थ्यांना घेऊन योगाचे बरेच प्रकार सादर केले. आणि अशा प्रसन्न वातावरणात शाळेच्या सर्व शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यांसोबत योग क्रिया केल्या.
   योगा हा भविष्याचा आणि आरोग्याचा मुख्य पाया असून तो रोज करायला हवा ही शिकवण सदरील कार्यक्रमातून उपस्थित मार्गदर्शकांनी दिली; यावेळी शाळा अध्यक्ष प्रा.शिवाजी पाटील सर यांनी स्वतः सर्व योगासने करून तब्बल 51 सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांसमोर सादर केले. उपरोक्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश जाधव यांनी केले तर आभार अर्जुन केंद्रे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!