संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध प्रकारचे योगासने व प्राणायाम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे प्रमुख पाहुणे म्हणून महिला पतंजलीच्या जिल्हा संवाद प्रभारी योगगुरू कलावती भातांब्रे, तालुका प्रभारी योगशिक्षिका विठाई फुलारी, शुभांगी पाटील, ऋतुजा मंदाडे, माध्यमिक मुख्याध्यापक मीना तोवर सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी योगशिक्षिका कलावती भातांब्रे,विठाई फुलारी, शुभांगी पाटील, ऋतुजा मंदाडे यांनी योग प्रार्थना, पूरक हालचाली, विविध आसने, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उष्टासन, शंकासन, उत्तम मंडूकासन, वक्रासन, कपालभाती,भ्रामरी प्राणायाम, संगीतमय योगा, शांतीपाठ इत्यादी आसने विद्यार्थी,पालक व शिक्षकांकडून करून घेतले, प्रारंभी सर्व प्रमुख पाहुण्यांना शाल व रोपटे देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख संगीता आबंदे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार रोकडोबा कुंडगीर यांनी मानले. योग सोहळ्याचा समारोप पसायदानाने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
