मा.सहकार मंत्री यांच्या उपस्थितीत संयोग व योग संगम कार्यक्रम संपन्न
मा.सहकार मंत्री यांच्या उपस्थितीत संयोग व योग संगम कार्यक्रम संपन्न
शिरूर (गोविंद काळे) : ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सी.सी.आर.वाय.एन.; आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने संयोग व योग संगम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नामदार श्री बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सौ.मंजुषा लटपटे; चाकूरचे तहसीलदार एन. बी. जाधव; शिक्षणाधिकारी श्री ढोकाडे बबनराव; केंद्रप्रमुख कासार शफि्योद्दीन,माजी नायब तहसीलदार ओम सोनी,सरपंच श्री मच्छिंद्र वाघमारे,उपसरपंच श्री सूरज पाटील; माजी नगरसेवक ॲड. निखिल कासनाळे, विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी व एक हजार नागरिक उपस्थित होते. यावेळी सामान्य योग अभ्यासक्रम, विशेष योग सत्र व व्याख्याने,चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आशा योग नॅचरोपॅथी अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास स्वामी विवेकानंद विद्यालय व आय. एन. ओ. सूर्या फाउंडेशन यांनी सहकार्य केले. “योगसाधक राजूर वरवाळ” समूहाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगप्रशिक्षक योगरत्न डॉ. मेजर मधुसूदन चेरेकर यांनी योगाचे धडे उपस्थितांना दिले. त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये डॉ.चेरेकर यांनी पारंपारिक औषधी पद्धती आयुर्वेद, सिद्ध,युनानी,होमिओपॅथी आणि सोवा रीग्पा या प्रमाणेच योग सुद्धा पारंपारिक उपचार पद्धती आहे याबद्दल व्याख्यान दिले,त्यानंतर डॉ. वाघमारे लक्ष्मीकांत यांनी विविध विकारामध्ये योगामुळे होणारे लाभ यावर व्याख्यान दिले,योगाचार्य शिवमुर्ती भांतांब्रे यांनी सामाजिक व पारिवारिक शांतीसाठी योग या विषयावर व्याख्यान दिले, डॉ.सौ. मीरा गोदेपुरे यांनी गर्भसंस्कार तर सौ. प्रेमा वतनी यांनी महिलांच्या आरोग्यावर योगामुळे होणारा लाभ यावर व्याख्यान दिले, तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री दीपक भराटे,सौ. सुमन पवार,पतंजली जिल्हा महिला प्रभारी;मुख्याध्यापक क्रीडाभूषण श्री केशव मुंडकर, श्री धनेश गोलावार, विशाल डुब्बेवार, सूर्यकांत मोरे,डॉ. ऋतुजा वाघमारे, चैतन्य वाघमारे, डॉ. वाघमारे लक्ष्मीकांत, श्री अरविंद कांडनगिरे,श्री राजकुमार बलदवा, डॉ अशोक गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. शिक्षक,विद्यार्थी,कर्मचारी यांच्यासह सुमारे १००० लाभार्थी नागरिक उपस्थित होते या प्रसंगाविषयी बोलताना मंत्री महोदय म्हणाले:-“
निर्धार नियमित योगाचा,
मंत्र निरोगी जीवनाचा….
आज २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन या औचित्याने स्वामी विवेकानंद विद्यालय शिरूर ताजबंद येथे सी.सी.आर.वाय.एन. आयुष मंत्रालय भारत सरकार आयोजित योग दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची व सहभाग घेण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची बाब ठरली.
योग ही केवळ शारीरिक व्यायामपद्धती न राहता, मानसिक स्थैर्य, मन:शांती व समतोल जीवनशैली घडविण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. या दिवशी घेतलेली प्रेरणा दैनंदिन जीवनातही टिकवावी, हीच सदिच्छा या प्रसंगी व्यक्त केली.”
