राष्ट्राच्या आरोग्यासाठी योगसाधना महत्वाची…भारतीय जनता पार्टी अहमदपुर च्या वतीने चार दिवसीय योग शिबीर संपन्न

0
राष्ट्राच्या आरोग्यासाठी योगसाधना महत्वाची…भारतीय जनता पार्टी अहमदपुर च्या वतीने चार दिवसीय योग शिबीर संपन्न

राष्ट्राच्या आरोग्यासाठी योगसाधना महत्वाची…भारतीय जनता पार्टी अहमदपुर च्या वतीने चार दिवसीय योग शिबीर संपन्न

अहमदपुर (गोविंद काळे) : आजच्या धावपळीच्या युगात शरीराकडे दुर्लक्ष होत असून अनेक आजाराला माणसे बळी पडत आहेत यामुळे प्रत्येकाने योग साधना करावी योग साधनेमुळेच राष्ट्राची नवनिर्मिती होऊन देशातील लोकांचे आरोग्य सुधारेल असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय योगशिक्षक योगरत्न डॉ मेजर मधुसूदन चेरेकर यांनी केले.
सानवी मंगल कार्यालय अहमदपूर येथे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमित रेड्डी व सिनेट सदस्य ऍड निखिल कासनाळे यांच्या वतीने चार दिवशीय योग शिबिर घेण्यात आले सकाळी पाच ते सात या वेळेत या शिबिराचे आयोजन करून अनेकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले यावेळी डॉ चेरेकर बोलत होते. यावेळी
योगाचार्य सौ कलावती आणि योगमूर्ति शिवमुर्ती भातांब्रे; योग शिक्षिका शिक्षिका प्रेमा वतनी, सूर्यनमस्कार तज्ञ योग शिक्षक प्रमोद कुलकर्णी ;तालुका महिला पतंजली योग समिती प्रभारी विठाई फुलारी ;आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका शुभांगी पाटील; आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका वृषाली चवळे; ज्येष्ठ योगसाधिका अरुणा जाधव; योगशिक्षिका मंगल नागपूर्णे; गर्भसंस्कार विशेषज्ञ; डॉक्टर मीरा गोदेपुरे डॉ विजय गोदेपुरे; भाजप पदाधिकारी प्रणिता बेंबळे; निसर्गोपचार तज्ञ डॉ.अशोक गायकवाड; जगद्गुरु तुकोबाराय योगा ग्रुपचे अध्यक्ष मारोती बुद्रुक पाटील, उपाध्यक्ष चिंतामणी येवंदगे योगशिक्षक सोमनाथ रोडगे, योगशिक्षक अशोक तावडे,ज्येष्ठ नागरिक माधव शिवणगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ चेरेकर म्हणाले की माणूस पैशाच्या पाठीमागे लागला असून धावपळीच्या काळात स्वतःकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही यामुळे देशाचे आरोग्य धोक्यात आले आहे राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी प्रशासनाने आरोग्य केंद्रात आणि प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांची नेमणूक करून देशाचे आरोग्य सुधारावे असे झाल्यास तरुण पिढी योग्य साधने कडे आल्यास राष्ट्राची प्रगती होऊन आरोग्य सुधारेल असे डॉ चेरेकर म्हणाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!