डॉ. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांचा शिक्षक साहित्य संघाकडून सत्कार

0
डॉ. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांचा शिक्षक साहित्य संघाकडून सत्कार

उदगीर (प्रतिनिधी )
उदगीर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व श्री. धोंडूतात्या कनिष्ठ महाविद्यालय, माळहिप्परगा येथील मराठी विषयाचे प्राध्यापक,कवी आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती, पुणे चे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर निवृत्तीराव हंडरगुळीकर यांना अमेरिकेतील” वॉशिंग्टन डिजिटल युनिवर्सिटि”कडून त्यांच्या परिवर्तनवादी मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी “डॉक्टर ऑफ लिटरेचर इन मराठी “ही सर्वोच्च मानद डॉक्टरेट मिळाली आहे. त्याबद्दल उदगीर परिसरातील सुपरिचित लेखक हंडरगुळीकर यांचा त्यांच्या शिवशक्ती नगर येथील निवासस्थानी शिक्षक साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य या साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीच्या वतीने मराठावाड्याचे विभागीय सचिव, ज्येष्ठ कथाकार प्रा. अंबादास विठ्ठलराव केदार यांच्या शुभहस्ते सुप्रसिद्ध गीतकार साहित्यिक प्रा. रामदास केदार यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. ज्ञानेश्वर हंडरगुळीकरांचा शाल, पुष्पहार व ग्रंथभेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हंडरगुळीकर यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ” शिक्षक साहित्य संघाकडून घेतलेला सन्मान हा सर्व शिक्षकांतर्फे प्रातिनिधिकतेने घेतलेला तमाम शिक्षक कुटुंबांकडूनचा सन्मान होय “असेही डॉ. हंडरगुळीकर म्हणाले. त्यांनी शेवटी सर्वांचेच आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!