राज राजेश्वरी मंदिर येथे हरित योग शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
राज राजेश्वरी मंदिर येथे हरित योग शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उदगीर (एल पी उगिले) जागतिक योग दिनानिमित्त राज राजेश्वरी मंदिर संस्थान (निटुरे ॲग्रो टुरिझम) मल्लापुर येथे आयोजित हरित योग शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जागतिक योग दिनानिमित्त मोरारजी देसाई नॅशनल इस्टिटुट ऑफ योग यांच्या मार्फत संजीवनी सेवा संस्था, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व संजीवनी लाईफ केअर ट्रस्ट यांच्या वतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
योग शिबीराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार राम बोरगावकर, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका महानंदा बहनजी, प्रोजेक्ट चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी योगाचार्य रामचंद्र गरड, पतंजली योग समिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षी स्वामी, योगशिक्षक भारत कोयले यांनी आयुष्य मंत्रालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योगाभ्यास घेतला. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली. या शिबीरात ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय उदगीर, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय उदगीर, स्वामी विवेकानंद महाविद्यालय उदगीर, इंटरॅक्ट क्लब ऑफ माउंट लिटेरा झी स्कुल, विद्यावर्धिनी हायस्कूल, चिन्मय स्वामी समिती, पतंजली योग समिती उदगीर, सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, रोटरॅक्ट क्लब ऑफ स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेज उदगीर, इंटरॅक्ट क्लब ऑफ
महेश प्राथमिक विद्यालय उदगीर, पोस्ते पोद्दार स्कुल व उदगीर तालुका पत्रकार संघ आदिंचा सहभाग होता. या हरित योग शिबीराच्या यशस्वीतेसाठी संजीवनी सेवा संस्थेचे प्रतीक निटूरे, संजीवनी लाईफ केअर ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. मनीषा बस्वराज येरटे, अरुण बिरादार, आकाश निटूरे, प्रभुदेव निटूरे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, उपाध्यक्ष रविंद्र हसरगुंडे, सचिव ज्योती चौधरी, महानंदा सोनटक्के, डॉ. दत्तात्रय पाटील, प्रशांत मांगुळकर, विद्या पांढरे, डॉ. सुलोचना येरोळकर, डॉ. संतोष पांचाळ, डॉ. सुधीर जाधव, रजनी उस्तुरे, विक्रम हलकीकर आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!