कै. बापूसाहेब एकांबेकर महाविद्यालयाचा अर्धवट रस्ता केल्यामुळे, विद्यार्थ्यांचे हाल

0
कै. बापूसाहेब एकांबेकर महाविद्यालयाचा अर्धवट रस्ता केल्यामुळे, विद्यार्थ्यांचे हाल

उदगीर (प्रतिनिधी) येथील निडेबन हद्दीत असलेल्या कै. बापूसाहेब एकंबेकर महाविद्यालयाचा अर्धवट रस्ता केल्यामुळे, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व रहदारी करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहे. कै. बापूसाहेब एकंबेकर महाविद्यालयाचा रहदारीचा रस्ता हा अर्धवट केल्यामुळे, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्ता खड्ड्यात आहे का खड्ड्यात रस्ता आहे, हे समजणे अवघड झालेले आहे. या बाबीकडे संबंधिताचे दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे, या रोडवर सर्वत्र चिखल झालेला आहे. या चिखलातून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे.आ. संजयजी बनसोडे व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून, तात्काळ रस्ता करावा, अशी या भागातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची मागणी आहे. जर याकडे दुर्लक्ष केल्यास विद्यार्थी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तरी संबंधितांनी तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!