विद्यावर्धिनी मध्ये गुणवंतांचा सत्कार

विद्यावर्धिनी मध्ये गुणवंतांचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर  द्वारा संचलित विद्या वर्धिनी हायस्कूल येथील आठवीच्या विद्यार्थ्यांनी सन 2020- 21 या शैक्षणिक वर्षात एप्रिल 2021 मध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती एन. एम .एम. एस परीक्षा दिली होती. या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी  लागला आहे. यात अकरा विद्यार्थी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये जाधव कृष्णकांत दिपकराव, बिरादार शुभम बालाजी, पटवारी श्रद्धा सुनील, कुमठेकर श्रुती सोमेश्वर,धोंडगे यशराज केशव, बिराजदार प्रणव भीमराव, माने समीक्षा व्यंकटेश,पाटील सुर्यशीला गोविंदराव,जाधव वेदांत रामदास,निरणे सोहम बलभीम, डिगोळे श्वेता बापूराव इ .विद्यार्थी यश मिळवून शाळेचे – आई – वडिलांचे नाव लौकिक केल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी उपमुख्याध्यापक अविनाश पोशेट्टी,पर्यवेक्षक एस.पी धुमाळे,शिल्पा पाटील,प्राजक्ता पाटील, एम. एस जाधव, आर. एन जाधव, बी.व्ही बिरादार, विपुल बोरोळे, कला शिक्षक एन. आर जवळे यांची यावेळी उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!