आत्मविश्वास व समर्पित भावनेतून कार्य केल्यास आदर्शात्मक कार्य उभे राहील – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृती ही परोपकारी, त्याग व बलीदानावरती आधारीत आहे. या देशातील महात्म्यांनी वेद, भगवत्गिता, रामायाणासारखे ग्रंथ मानवाला दिले. त्यातून जातीभेद, वर्णभेद दुराचाराला बाजूला सारून आदर्शात्मक मानव निर्माण करण्याची शिकवण गुरूकुल शिक्षणातून मिळाली. आज तरूणाला या शिक्षणाच्या विचाराला शिक्षण सुविधा फारशी नाही. निधर्मीपणाच्या नावावर आम्ही गुरूजनांचा विचार बंद करून ठेवला आहे. हा विचार कुराण, बायबल, भगवत्गितेतून मिळत असल्यास तो देण्याचे कार्य शासनकर्त्यांनी केले पाहिजे तरच समाजातील अमानवी दुराचार कमी होईल. देशाचे व्हिजनरी आत्मविपर्यासी भारतीय संस्कृतीचे पुरस्कृर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन सी.बी.सी.एस. शिक्षणपध्दती आणून त्यातून रिसर्च, उद्योग व्यवसाय, योगा व अध्यात्म सुविचार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून भारताचा चेहरा-मोहरा बदलेल तसेच आत्मविश्वास व समर्पित भावनेतून कार्य केल्यास आदर्शात्मक कार्य उभे राहील, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते कव्हा ग्रामपंचायतीच्यावतीने निसर्ग दिनानिमित्त राजीव नगर ते कव्हा रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीच्या शुभारंभप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी एम.एन.एस.बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, कव्हा ग्रामपंचातीचे उपसरपंच किशोर घार, शिवशरण थंबा, नेताजी मस्के, सदाशिव सारगे, गोेपाळ सारगे, काकासाहेब चौगुले, ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी, राम घार, मुख्याध्यापिका अरूणा कांदे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, समाज व निसर्ग उभारणीच्या कामात सर्वांनी निर्स्पह व व सेवाभाव वृत्तीने काम करावे. सेल्फीशची भूमिका ही स्वतःला व कुटुंबालाही शोभणारी नसते. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी काम करावे. कोरोनाच्या काळात ऑक्सीजनचे महत्त्व सर्वांना लक्षात आलेले आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकांनी घरासमोर एक तरी झाड लावून त्याच्या संवर्धनाचा संकल्प करावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निसर्ग प्रतिष्ठाणचे ऋषिकेश दरेकर यांचा वाढदिवस साजरा करून प्रतिष्ठाणचे पदाधिकारी अॅड.सर्फराज भाई, इंजि.शिवशंकर सुफलकर यांचा शाल व वृक्ष भेट देवून सत्कार करण्यात आला. तसेच राजीव नगर ते कव्हा परिसरात रस्त्याच्या दुतर्फा 2 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये प्राध्यान्याने ऑक्सीजन पुरवठा करणार्या पिंपळाच्या रोपांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी यांनी केले. यावेळी इब्राहिम शेख, शरद पाटील, लक्ष्मण सुर्यंवंशी, विष्णू तिघीले, डॉ. खरबडे, सचिन घार, शिवाजी घार, माणकरी, देशमुख यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
निसर्ग दिनी निसर्ग उभारणीचे काम !!
योगयोग निसर्ग दिनी एक नव्हे, दोन नव्हे.. तर तब्बल 2 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये ऑक्सीजन पुरवठा करणार्या पिंपळाच्या इतर रोेपांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. या रोपांची लागवड बिहार पॅटर्ननूसार करण्यात आली असून यामुळे कव्हा गाव व परिसरातील मजूंराना कामही मिळालेले आहे. निसर्ग दिनी निसर्ग उभारणीचे काम आपल्या हातून होत आहे. ही कव्हा ग्रामस्थांच्या दृष्टिने महत्त्वाची बाब असल्याचे ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी यांनी प्रारंभी प्रास्ताविकात सांगितले..