साई ग्रामस्थांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार

साई ग्रामस्थांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार

गावकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील मौजे साई ते गव्हाण पानंद रस्ता गेले अनेक वर्षापासून झालेला नव्हता या पानंद रस्त्यासाठी साई गावकऱ्यांनी सतत केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे आज ते काम प्रगतीपथावर चालू असून त्याबद्दल साई ग्रामस्थांनी पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी निवडणूक वेळेस रस्त्याचे काम करून देण्याचा शब्द दिला होता व गावकऱ्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे. पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला याबद्दल साई ग्रामस्थांनी पालकमंत्री अमित देशमुख साहेबांचे आभार मानले आहेत. पण काही स्वार्थी मंडळी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या कामाचे श्रेय लाटत असून हे काम आम्हीच केले आहे व ते आमच्याच प्रयत्नाचे फळ आहे असे दाखवत आहेत. पण अशा लोकांना गावकरी थारा देणार नाहीत व भीक घालणार नाहीत असे मत गावकर्यांनी व्यक्त केले आहे. साई ते गव्हाण पाणंद रस्त्याचे काम आता ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे अगदी प्रगतीपथावर चालू असून शेतकरी व गावकरी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामासाठी सततचा पाठपुरावा करणारे साई ग्रामस्थ व सरपंच सुमित्रा श्रीमंत माने, उपसरपंच अमोल श्रीपतराव पवार, माजी प्रशासक लालासाहेब दत्तू पवार, हनुमंत पवार व इतर सर्व ग्रामस्थांनी, युवकांनी पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.

About The Author