आयपीडीएस योजनेअंतर्गत प्रलंबीत कामे तातडीने पूर्ण करा!
महावितरणचे संचालक यांच्या कडे युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची मागणी…!
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात विद्यूत विभागाचे विविध कामे आयपीडीएस योजनेंतर्गत मंजूर असून सूध्दा अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमूळे प्रलंबीत असलेले कामे तातडीने सूरूवात करावेत अशी आग्रही मागणी युवकनेते डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी महावितरणच्या पायाभूत अराखडा विशेष प्रकल्पाचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांची भेट घेवून एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड येथील कार्यालयामध्ये नूकतीच त्यांची भेट घेवून मागणीचे सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात पूढे म्हटले आहे की,अहमदपूर शहराचा वाढ व विस्तार मोठ्या झपाट्याने झाला असून त्या प्रमाणात महावितरणच्या सुविधा अपुऱ्या आहेत. महावितरणच्या वतीने (आयपीडीएस) एकात्मिक उर्जा वितरण योजनेअंतर्गत शहरातील अनेक कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक कारणामुळे मंजूर झालेल्या निधीपैकी अर्धे अधिकच कामे पूर्ण झाले आहेत. योजनेत मंजूर असलेले बाकीचे सर्व कामे वेळेवर पूर्ण न करता चक्क रद्द करण्यात आलेले आहेत. संबंधित अधिकारी या प्रकरणी उडवाउडवीचे उत्तर देत असून आता ही योजनाच बंद झाली आहे. निधी परत गेला आहे आता निधी उपलब्ध होऊ शकत नाही अशा पद्धतीचे उत्तरे देत आहेत.
कूठलिही योजना यशस्वी पणे राबविण्याची जबाबदारी ही संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांची आहे.मात्र संबंधितांच्या अक्षम्य दुर्लक्षामूळे योजनेअंतर्गत शहरात नव्याने लागणारे विद्युत पोल, वीजवाहिन्या, ट्रांसफार्मर इत्यादी कामे प्रवंबीत राहीले आहेत. ही सर्व प्रलंबीत सर्व कामे झाल्यास महावितरणला विज वितरणाची सूलभ सोय होणार असून नागरिकांना यातून सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे खास बाब म्हणून मंजूर असलेली सर्व कामे पुनरुज्जीवित करून ही कामे पूर्ण करावेत व शहराला महावितरणच्या वतीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निवेदनात म्हटले आहे.
एकूणच अहमदपूर शहराच्या नवीन भागात तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवीन पोल बसविणे, नवीन विद्यूत तार ओढणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविने इत्यादी कामे प्रलंबीत असून कूठल्याही परिस्थितीत ही कामे होणे गरजेचे आहे तरच खर्या अर्थाने नागरीकांना सुलभ सेवा मिळू शकेल असेही शेवटी डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी म्हटले असून निवेदनाच्या प्रती उर्जामंत्री, महावितरण चे कार्यकारी संचालक यांना देण्यात आल्या आहेत.