डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा

0
डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी. उगीले) श्रीगुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिश
डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ५७ वा जन्मोत्सव विविध उपक्रमाने उत्साहात संपन्न झाला.
श्रीगुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिश डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ५७वा जन्मोत्सवानिमित्त श्रीगुरु हावगीस्वामी महाराजांचा रुद्रा अभिषेक करण्यात आला. तदनंतर संपन्न झालेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास शंकरलिंग शिवाचार्य महाराज हानेगाव,बसबलिंग शिवाचार्य महाराज कौळास, म.नि.प्र. जयशांतलिंग महास्वामी हिरेनगाव, म.नि.प्र. बसवलिंग महास्वामी अक्कलकोट, म.नि.प्र. गंगाधर महास्वामी जेवळी, म.नि.प्र. शिवानंद महास्वामीजी सायगाव, बिलगुंदी महास्वामी, रटकल महास्वामी, मुगळी महास्वामी, कित्ता महास्वामी, चांबाळ महास्वामी, शि.भ.प. उध्दव महाराज हैबतपुरे, आदी महाराजांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बस्वराज पाटील , बाजार समितीचे , माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, बाजार समितीचे माजी उपसभापती रामराव बिरादार, न.प.चे माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल अनकले, गणेश गायकवाड, राजकुमार हुडगे, शांतविर स्वामी बटनपुरकर, माजी नगरसेवक मनोज पुदाले, माजी नगरसेवक ऍड. दत्ता पाटील, जंगम समाजाचे अध्यक्ष विजयकुमार स्वामी, विरशैव समाजाचे माजी सचिव बाबुराव पांढरे, देशमुख डोनगाव, श्रीकांत पाटील, नेत्रगावचे सरपंच बालाजी पाटील, राजकुमार बिरादार बामणीकर आदि उपस्थित होते. सर्व महास्वामीजींच्या उपस्थितीमध्ये डॉ. शंभुलिंग
शिवाचार्य महाराजांचा पुष्पमाला अर्पण करुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
जन्मोत्सवा निमित्त उदगीर शहर व परिसरातील व सिमावर्ती भागातील स्वातंत्र सैनिक, माजी सैनिक, जेष्ठ नागरीक व विविध परिक्षेत गुणवंत ठरलेले विद्यार्थी अशा एकुण 121 जणांचा गौरव शाल, प्रमाणपत्र व गुच्छ देवून करण्यात आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बस्वराज पाटील यांचा डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जन्मोत्सवा निमित्त स्वरशिरोमणी गायक हावगी उत्तम पन्नासे यांना स्वरगंधर्व पुरस्कार डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जन्मोत्सवानिमित्त श्रीगुरु हावगीस्वामी महिला भजनी मंडळ, नवशा महादेव महिला भजनी मंडळ, सोमेश्वर भजनी मंडळ, बसवणकेरी भजनी मंडळ, ओंकारेश्वर महिला भजनी मंडळ, शिवशक्ती महिला भजनी मंडळ, मन्मथेश्वर महिला भजनी मंडळ, सिध्दरामेश्वर भजनी मंडळ, विरेश्वर भजनी मंडळ, तपसिध्देश्वर महिला भजनी मंडळ, हनुमान कट्टा महिला भजनी मंडळ, सुखशांती महिला भजनी मंडळ, मन्मथशिवलिंग महिला भजनी मंडळ, कपाळे गल्ली भजनी मंडळ, सोन्यामारोती भजनी मंडळ, समता नगर भजनी मंडळ आदिंनी शिव भजन सादर केली. तर गायक स्वर शिरोमणी हावगी उत्तम पन्नासे यांनी स्वतंत्र सैनिकांच्या सत्कार प्रसंगी देशभक्तीपर गीत गावुन उपस्थितांचे मने जिंकली.
जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमास उदगीर परिसरासह सिमाभागातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शि.भ.प. किर्तनकार शिवराज नावंदे गुरुजी, संचलन व आभार वेदमुर्ती विरभद्र स्वामी सताळकर यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!