शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, आर्थिक मदतीसाठी युवक काँग्रेसची शासनाला साकडे

0
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, आर्थिक मदतीसाठी युवक काँग्रेसची शासनाला साकडे

उदगीर (एल पी उगिले) गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. खरीप हंगामाची पेरणी करत असतानाच पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली असून, आता पुन्हा एकदा पेरणीसाठी मोठ्या आर्थिक खर्चाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने शासनाकडे दुबार पेरणीसाठी तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
दुसरीकडे, पिक विमा, शेतकरी कर्जमाफी, अनुदान व अन्य योजना यासाठी लागणाऱ्या ऑनलाईन प्रक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोठ्या अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऑनलाईन प्रक्रियेची जबाबदारी प्रशासनाने स्वतःवर घ्यावी, अशीही जोरदार मागणी करण्यात आली आहे. उदगीर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विवेक जाधव जी त्यांच्या सहकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ही निवेदने सादर करून शेतकऱ्यांच्या समस्या त्वरीत सोडवाव्यात, अशी मागणी केली.विवेक पंडितराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनांमध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ठोस भूमिका घ्यावी आणि येणाऱ्या हंगामात कोणताही शेतकरी आर्थिक अडचणींमुळे पेरणीपासून वंचित राहू नये, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नोंदवण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आदर्श पिंपरे, जिल्हा सरचिटणीस फैय्याज डांगे, सचिन बामणे, सद्दाम बागवान, प्रीतम गोखले, प्रमोद हुडगे, प्रवीण पटवारी, एडव्होकेट श्रीनिवास मंगनाळे, एडव्हकेट विशाल कुंभार यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!