घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीना 1 लाख 42 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक.

0
घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीना 1 लाख 42 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक.
 लातूर (एल पी उगिले)    लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत एक लाख 42 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत थोडक्यात माहिती की, काही दिवसांपूर्वी औसा तालुक्यात रात्रीच्या वेळी घरचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिन्याची चोरी केल्याची घटना घडल्या होत्या. त्यावरून पोलीस ठाणे भादा व किल्लारी येथे अज्ञात आरोपीता विरुद्ध दाखल करण्यात होते.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला रात्रीच्या वेळी घराचे कडीकोंडा तोडून चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून दिनांक 23 जून रोजी पथकाने खंडापूर टी पॉइंट परिसरातून मोटार सायकल वरील दोघांना ताब्यात घेतल. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव ओम बाळू शिंदे, (वय 19 वर्ष, राहणार कोंड, तालुका जिल्हा धाराशिव).
असे असल्याचे सांगितले. त्याच्यासोबत एक एक विधी संघर्ष बालक मिळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ त्यांनी चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने व 3 चोरीचे मोबाईल तसेच एक मोटरसायकल असा एकूण 1 लाख 42 हजार 500 रुपयांच्या मुद्देमाल मिळून आला.
नमूद आरोपी ओम बाळू शिंदे याने त्याचे सोबतचा विधी संघर्ष बालक व सुनील उर्फ काळ्या श्रावण शिंदे, वय अंदाजे 27 वर्ष, राहणार सुंबा तालुका जिल्हा धाराशिव. (फरार), अजय श्रावण शिंदे, वय अंदाजे 30 वर्ष, राहणार सुंबा तालुका जिल्हा धाराशिव. (फरार) अशांनी मिळून पोलीस ठाणे भादा व किल्लारी हद्दीतून घरफोडी करून सदरचे मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने तसेच पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतून चोरल्याचे कबूल केले.
स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कारवाई करत पोलीस ठाणे भादा येथील दोन, घरफोडीचे गुन्हे तर पोलीस ठाणे किल्लारी येथील एक घरफोडीचा गुन्हा व पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
नमूद आरोपीस त्यांनी चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे भादा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

               सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील  सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, अमितकुमार पुणेकर, पोलीस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, रामलिंग शिंदे, पिराजी पुठ्ठेवाड, राजेश कंचे, गणेश साठे, मोहन सुरवसे, नकुल पाटील, शैलेश सुडे, सुहास जाधव, धनंजय गुट्टे, गोरोबा इंगोले, महिला पोलीस अमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!