अहमदपूर रोटरीने तर्फे 500 वारकऱ्यांची निशुल्क आरोग्य तपासणी व औषध उपचार…
अहमदपूर रोटरीने तर्फे 500 वारकऱ्यांची निशुल्क आरोग्य तपासणी व औषध उपचार…
कंधार पंढरपूर पायी वारीत जाणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी..
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील थोरले वाडी येथे रोटरी क्लब अहमदपूरच्या वतीने
कंधार येथील श्री संत साधू महाराज दिंडीतील कंधार ते पंढरपूर पायी वारीने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी निशुल्क आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिर आयोजित करून या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या साह्याने जवळपास 500 वारकऱ्यांची तपासणी व त्यांना औषधे देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प चेअरमन धनंजय कोत्तावार यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
या शिबिरासाठी अहमदपूर, हाडोळती, शिरूर ताजबंद येथील तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली.
यामध्ये सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. पांडुरंग कदम, सर्जन डॉ .चंद्रकांत उगले, डॉ. निलेश मजगे, डॉ.राजेश्वर स्वामी, डॉ. दमकोंडवार, डॉ. नलवाड, डॉ. देवकते, डॉ खोमणे यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून आरोग्य सेवा दिली.
या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब तपासणे, व इतर सर्व आजारांची तपासणी करून त्यांना गरजेनुसार औषधांचे ही वाटप करण्यात आले.
या कार्यामध्ये अहमदपूर येथील मेडिकल औषध विक्रेता यांच्या टीमने
उपस्थित राहून शिबिर यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य दिले.
यावेळी रोटरी क्लब अहमदपूरचे अध्यक्ष राजीव कल्याणे, सचिव अनिल फुलारी, नूतन अध्यक्ष कपिल बिरादार, नूतन सचिव धीरज ढेले, त्यांच्यासह डॉ. नंदकुमार गुणाले, डॉ वैभव रेड्डी,डॉ. सतीश पेड, महिंद्रा खंडागळे, नरसिंग चिलकावार, द मा माने, प्रा अनिल चवळे, गंगाधर याचवाड उपस्थित होते.
याच कार्यक्रमात श्री संत साधू महाराज संस्थानाचे श्री एकनाथ महाराज व . श्री ज्ञानेश्वर महाराज
महाराज यांचा रोटरीच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला.
याच ठिकाणी अहमदपूर येथील आर्य वैश्य समाजाच्या वतीने उपस्थित सर्व वारकऱ्यांना एकादशी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
यानंतर हरी नामाच गजर करीत दिंडी पुढे मार्गक्रमण केली.
या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुरेश डबीर,मनोज आरदवाड, माधव वलसे, भरत इगे, गोपाळ पटेल, संतोष मद्देवाड, भोसीकर, प्रशांत चलवदे, बारोळे, पंकज गादेवार त्यांच्यासह भक्त मंडळी व रोड सर्व रोटरीचे सदस्य यांनी सहकार्य केले.
