राजर्षी छत्रपती शाहु महाराज सामाजिक समतेचे व आरक्षणाचे जनक होते – डाॅ. बलीराम भुकतरे
उदगीर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती ववेगवेगळ्या समविचारी संघटनाच्या वतीने द 26-6-2025 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बीदर रोड स्थित शाहु महाराज पुतळयाला अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलतांना लातुर जिल्हा महाराष्ट्र अनिस चे प्रधान सचिव डाॅ. बळीराम भुकतरे यांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.शाहु महाराज सर्वसमावेशक,लोकहितवादी, आधुनिक विचारसरणीचे कर्ते समाज सूधारक होते. त्यांनी बहुजन समाजातील विदयार्थ्याना शिक्षणाची दारे उघडी करून दिती. अस्पृश्यता निमुर्लन,अंधश्रध्दा निर्मुलन व सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे कार्य केले.विदयार्थी वसतीगृहे काढली. उच्च शिक्षणासाठी डाॅ. बाबासाहेब अंबेडकरांना मदत केली. आपल्या राज्यात सर्वप्रथम आरक्षण देवून बहूजन समाजाला मूख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करणारे शाहू महाराज यांचे कार्य महा. अनिस पुढे नेत आहे.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समीती शाहु महाराजांचा वैचारिक वारसा चालवत आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये अनिसचे जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे गुरूजी, उदगीर उपाध्यक्ष बाबूराव माशाळकर, रोटरी क्लबचे डाॅ. दत्ता पाटील, उदगीर अनिसचे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील, प्रधान सचीव शिरिष रोडगे,पांडूरंग बोडके,प्रा. गोपाळ पाटील, मराठा सेवा संघाचे संभाजी ब्रिगेड चे डाॅ. रामचंद्र भांगे, माधव कल्याणकर, जिव्हाळा ग्रुपचे दशरथ शिंदे बाबुराव वाघमारे , प्रख्यात लेखक धनंजय गुडसुरकर, प्राध्यापक शाम डावळे,पत्रकार राम मोतीपोवळे, आनंदी ग्रुपचे गोविंद निटूरे, साईनाथ चिमेगावे,दिलीप मजगे, विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
